Thursday, February 4, 2010

देवाचे प्रयोग

(स्वत:लाच कधी कधी स्वत:चा एखादा गुण आवडत नाही, त्याबद्दल..)

एकदा ना एक गम्मत झाली,
एका सिंहाच्या आत्म्याने शेळीचा जन्म घेतला,
चारा त्याला गिळ्वेना, डरकाळी काही फुटेना,
मनातली डरकाळी ऐकू जात नसे कुणाला

त्याचं मन खात होतं
त्याला,
की एक सिंह एका शेळीला खाऊन सुखी होता?

एकदा अजून एक गम्मत झाली,
एका शेळीच्या आत्म्याने सिंहाचा जन्म घेतला,
सिंह-पुरात गवत खातो म्हणून वेडा ठरवला गेला,
आणि शेळीचं मांसही कसा खाणार बिचारा?

स्वत:ला खायला स्वत:च शोधत फिरणारा
हा असा कसा भुकेला कस्तुरी-मृग ?
--
मिलिंद

4 comments:

  1. "कस्तुरी-मृग" - सहीच!
    बुद्धिबळाच्या खेळात प्याद्याच्या शेळीचा शेवटच्या घरात जाऊन होणारा वाघ आठवला.

    लिहिता रहा :)

    ReplyDelete