Sunday, February 7, 2010

द्वैत

धरणी नं सोडलं आभाळासाठी
तिचं ते अपूर्णतेतलं निरागस, कल्पक स्वातंत्र्य
ज्याचं नेमकं आभाळाच्या लेखी काssही नाही !
आणि आभाळानं त्यागली
त्याची ती निर्गुण, आत्म-मग्न संपूर्णता
त्याचं नेमकं धरणीच्या लेखी काssही नाही !

तरीही येतात एकत्र दोघं..
तो चिडतो, गडगडतो, गारा आणि वीज पाडतो,
ती ही संतापानं थरथर कापते,
ज्वालामुखी फुटतो कधी कधी,
पण बनवतात एकत्र - एक उद्याचं क्षितिज !

--
मिलिंद

3 comments:

  1. द्वैत आणि त्यातून एकत्र विकसित होणारी एखादी सुरेख गोष्ट - फार सुंदर प्रतिमा आहे! गोड लिहिलंयंस :)

    ReplyDelete
  2. :) Kharach goad lihilay!!
    You have portrayed the duality and dependence very nicely.
    Congrats!!

    ReplyDelete