Saturday, January 16, 2010

माझे नावडते शिक्षक

न आवडणाऱ्या शिक्षकांसाठी खास.. (कवी अनिलांची क्षमा मागून),


कुणी
जाल का सांगाल का
सुचवाल का त्या शिक्षकां
काहीतरी सांगू नको,
भरवू नको नुसता फळा!

तव शास्त्र-बाता झेलुनी
आधीच पोरे गांजली
बघ अंत खडुचा पाहता
तज्जन्म झिजुनी संपला..

अमुचा हि त्रास न वेगळा ..
खडुशी जमे समवेदना
म्हणुनी च का रे सांगना
म्हणती 'खडूस' मुले तुला?

फुलती वनी झेंडू फुले
बाकांवारी तितुक्या 'फुल्या'
रचितो अता नामावली
'कुसहस्रनाम' जपायला !

--
मिलिंद

13 comments:

  1. :-)
    मस्त झालंय विडंबन, मनू!
    चालू ठेव.

    ReplyDelete
  2. Never new u are that good a poet.

    ReplyDelete
  3. KADAK, bhari zaliye kavita :)..........

    ReplyDelete
  4. Milind Nice short poem. I liked the "Khadoos" concept. Laughed out a lot.

    ReplyDelete
  5. good show :)
    mandar ne esakal-style comment ka taakliy? :P

    ReplyDelete
  6. :D Loved the blog name.निरीक्षणसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक:।

    आणि हे विडंबन चांगलं आहे - पहिलं आणि शेवटचं कडवं भारी जमलंय- शब्द अजिबात ओढून-ताणून वाटत नाहीयेत आणि तरी वृत्तात बसलीत ती कडवी.
    ’अंत खडुचा पाहता’...मस्त श्लेष!

    ReplyDelete
  7. Thank you all :)

    @ Dada : :)

    @ अभिजित : me too!


    @ गायत्री : हो! 'कि खडूस ..' असं लिहिताना मलाच मज्जा नाही आली.. काही वेगळं सुचलं तर सांग नक्की!
    आणि हो! सुट्टी हून परत निघताना तूच दिले होतेस ना भडंग बांधून? पुरवून खातोय, संपवणार नाही ते मी, इतक्यात ! :)

    ReplyDelete
  8. अरे मस्त रे! छान जमलयं. कुणा शिक्षकापर्यंत पोचले का?

    ReplyDelete
  9. 'म्हणुनीच का रे सांग ना
    म्हणती खडूस (इथे/ मुले/ जगीं) तुला?’
    हे कसं आहे?

    ReplyDelete
  10. @ Prasad : thanks!!
    @ Gayatri : bhari ahe!! change karNar... Reference kasa detat kavitet?
    eg. Gayatri et al Journal of Sandhyanand 2010 asa ka??
    :D

    ReplyDelete