न आवडणाऱ्या शिक्षकांसाठी खास.. (कवी अनिलांची क्षमा मागून),
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या शिक्षकां
काहीतरी सांगू नको,
भरवू नको नुसता फळा!
तव शास्त्र-बाता झेलुनी
आधीच पोरे गांजली
बघ अंत खडुचा पाहता
तज्जन्म झिजुनी संपला..
अमुचा हि त्रास न वेगळा ..
खडुशी जमे समवेदना
म्हणुनी च का रे सांगना
म्हणती 'खडूस' मुले तुला?
फुलती वनी झेंडू फुले
बाकांवारी तितुक्या 'फुल्या'
रचितो अता नामावली
'कुसहस्रनाम' जपायला !
--
मिलिंद
:-)
ReplyDeleteमस्त झालंय विडंबन, मनू!
चालू ठेव.
Never new u are that good a poet.
ReplyDeletemast re, bhidu!
ReplyDeleteKADAK, bhari zaliye kavita :)..........
ReplyDeletebesht!
ReplyDeleteMilind Nice short poem. I liked the "Khadoos" concept. Laughed out a lot.
ReplyDeletegood show :)
ReplyDeletemandar ne esakal-style comment ka taakliy? :P
:D Loved the blog name.निरीक्षणसमये प्राप्ते काक: काक: पिक: पिक:।
ReplyDeleteआणि हे विडंबन चांगलं आहे - पहिलं आणि शेवटचं कडवं भारी जमलंय- शब्द अजिबात ओढून-ताणून वाटत नाहीयेत आणि तरी वृत्तात बसलीत ती कडवी.
’अंत खडुचा पाहता’...मस्त श्लेष!
Thank you all :)
ReplyDelete@ Dada : :)
@ अभिजित : me too!
@ गायत्री : हो! 'कि खडूस ..' असं लिहिताना मलाच मज्जा नाही आली.. काही वेगळं सुचलं तर सांग नक्की!
आणि हो! सुट्टी हून परत निघताना तूच दिले होतेस ना भडंग बांधून? पुरवून खातोय, संपवणार नाही ते मी, इतक्यात ! :)
Manya, lay jhakas :)
ReplyDeleteअरे मस्त रे! छान जमलयं. कुणा शिक्षकापर्यंत पोचले का?
ReplyDelete'म्हणुनीच का रे सांग ना
ReplyDeleteम्हणती खडूस (इथे/ मुले/ जगीं) तुला?’
हे कसं आहे?
@ Prasad : thanks!!
ReplyDelete@ Gayatri : bhari ahe!! change karNar... Reference kasa detat kavitet?
eg. Gayatri et al Journal of Sandhyanand 2010 asa ka??
:D