Friday, January 22, 2010

ओवी ला त्रास

कुणीसं म्हटलंय (मीच म्हटलंय),
'भावनांच्या सूक्ष्म छिद्रातून' शब्द ओवले की ओवी तयार होते!
दुष्काळात गोवल्या गेलेल्या काही ओव्या अश्या :

-
कड्यावर कोणी
किडे करू जात
कड्या कपारीत
कोसळला.

--
खरी खरी खीर
खोटी खसखस
खाई दोन्ही घास
खारुताई.

---
गगन गंभीर
गर्जत गाजत
गारांना गाडत
नव्या गारा.

----
घोरत्या घशात
घुसले घुबड
घुबडही गोड
घोरु लागे.

-----
चिमणा चिमणी
निघाले चराया
छोट्या चिऊला या
भीती वाटे.

------
छे !

:मिलिंद

11 comments:

  1. बाSSSप! दुष्काळातही अगदी छान बाळसं धरलंय ओव्यांनी!
    स त कुडचेडकरांच्या लैनीवरचं वाक्य: =)
    खारूताई, गगन, घुबड आणि चिमणा खास आवडल्या :)

    ReplyDelete
  2. अरे हे महान आहे :)
    बेष्ट जमलंय!
    "ओवी" ची व्याख्या काय रे?

    ReplyDelete
  3. Khup khup sundar. :)
    I think I like the kharutai best. :)
    You seem to be more concentrated version of your brother. :D

    ReplyDelete
  4. पार्टी पेटला
    पोएट्री पेटवली
    पेटलेल्या पार्टीला
    प्रणाम पार्थचा

    :P

    ReplyDelete
  5. Gadre!!!! He uttam ahe!!!!!!! Wah wah!!!

    ReplyDelete
  6. thank you all :)

    @ Saee: hehe! asel bua kay mahit!

    ReplyDelete
  7. LOL..paTaapaTaa puDhe liheeeeeee!

    ReplyDelete
  8. thank you Swayambhu!
    thanks Salil, Gayatri ! :)

    ReplyDelete