संवेदनशीलता किंवा संवेदनशील मन ह्या नक्की काय भानगडी आहेत असा प्रश्न पडलेला असताना मनात एक विचार अाला तो सांगावासा वाटतो.
जी हरवल्यावर मुळात काही हरवलंय हे कळतंच नाही, (काय हरवलंय तो भाग सोडून द्या,) ती म्हणजे संवेदनशीलता !
जी हरवल्यावर केवळ तिच्या हरवण्यामुळे निर्माण झालेले प्रश्न दिसतात, पण प्रश्नांचं मूळ हाती लागत नाही ती संवेदनशीलता !
Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts
Friday, June 10, 2011
Sunday, July 4, 2010
अ-कलेचे चांदणे
काजळ रात्री दोन चंद्र दाखवतील दिशा
कलेकलेच्या चंद्राचा कुणा भरवसा ?
आज पडलाय वारा तरी नावेत माझ्या येशील ?
तुझ्या चंद्रांना चांदणी ही हिऱ्याची घेशील ?
--मिलिंद
कलेकलेच्या चंद्राचा कुणा भरवसा ?
आज पडलाय वारा तरी नावेत माझ्या येशील ?
तुझ्या चंद्रांना चांदणी ही हिऱ्याची घेशील ?
--मिलिंद
Monday, April 26, 2010
लपाछपी - काही "पराग -विचार"
'लपाछपी' हा महान खेळ आहे असं नेहमी वाटतं मला.. असा खेळ तर 'शोधूनही सापडणार नाही!'
खंत मात्र एक , लपाछपी मध्ये 'लपा' आणि 'छपी' दोन्ही लपण्याचेच शब्द आहेत! सगळेच लपून कसं चालेल? म्हणून 'hide and seek' जास्त सूचक नाव वाटतं. मराठीत 'शोधा म्हणजे सापडेल' सारखं काहीतरी चाललं असतं..
इंद्राला ताक मिळत नाही म्हणतात, मी तर म्हणतो त्याला लपाछपी ची ही मजा नाही मिळणार .. शेवटी 'सगळं काही सापडलेल्या' देवागणांना कसलं आलंय लपाछपीतलं thrill ( = 'बुंगाट मजा' किंवा 'एकशेवीस च्या स्पीड ने मजा') ??
एखाद्या येणाऱ्या घटनेचं anticipation (पूर्वानुभूती?) आणि त्यातली गम्मत लपाछपी मध्ये लपली आहे. मग पुढे लपलेला प्रत्येक क्षण जर आपण असाच, अगदी एक-एक शोधत 'लपाछपी' सारखा खेळलो, तर मग रोज काय मजाच मजा!
--मिलिंद
("पराग विचार" = random thoughts - by शशांकशंकया)

Thursday, February 11, 2010
सारीपाट
मी आहे बावन्न पत्त्यांमधला एक !
रोज-रोज, तेच ते लोक मला,
त्याच त्या एक्कावन्न पत्त्यांबरोबर पिसतात,
अन तोच एक डाव मांडून बसतात,
तरी त्यांना मजा येतेसं दिसतं !
आता मी आहे एक बशी !
रोज रोज माझ्यातून, तेच दोघं
तोच तो दुधाचा चहा पितात एकत्र..
कधी कधी मला एकमेकांवर फेकूनही मारतात !
त्यांच्या ह्या खेळात त्यांना मजा येत असेल का?
--
मिलिंद

Sunday, February 7, 2010
द्वैत
धरणी नं सोडलं आभाळासाठी
तिचं ते अपूर्णतेतलं निरागस, कल्पक स्वातंत्र्य
ज्याचं नेमकं आभाळाच्या लेखी काssही नाही !
आणि आभाळानं त्यागली
त्याची ती निर्गुण, आत्म-मग्न संपूर्णता
त्याचं नेमकं धरणीच्या लेखी काssही नाही !
तरीही येतात एकत्र दोघं..
तो चिडतो, गडगडतो, गारा आणि वीज पाडतो,
ती ही संतापानं थरथर कापते,
ज्वालामुखी फुटतो कधी कधी,
पण बनवतात एकत्र - एक उद्याचं क्षितिज !

Thursday, February 4, 2010
देवाचे प्रयोग
(स्वत:लाच कधी कधी स्वत:चा एखादा गुण आवडत नाही, त्याबद्दल..)
एकदा ना एक गम्मत झाली,
एका सिंहाच्या आत्म्याने शेळीचा जन्म घेतला,
चारा त्याला गिळ्वेना, डरकाळी काही फुटेना,
मनातली डरकाळी ऐकू जात नसे कुणाला
त्याचं मन खात होतं त्याला,
की एक सिंह एका शेळीला खाऊन सुखी होता?
एकदा अजून एक गम्मत झाली,
एका शेळीच्या आत्म्याने सिंहाचा जन्म घेतला,
सिंह-पुरात गवत खातो म्हणून वेडा ठरवला गेला,
आणि शेळीचं मांसही कसा खाणार बिचारा?
स्वत:ला खायला स्वत:च शोधत फिरणारा
हा असा कसा भुकेला कस्तुरी-मृग ?

Saturday, January 23, 2010
वेड
एक वेडा त्याचं वेड असं की
तो सारखं 'कबड्डी कबड्डी' म्हणायचा !
अजून एक वेडा त्याचं वेड असं की,
तो सारखं स्वत:शीच बोलायचा !
तसेच होते दोन वेडे,
एक तो नि एक ती,
त्यांचं वेड असं की,
सारखे एकमेकांशी बोलायचे!
आणि गम्मत म्हणजे,
एकाच वेळी वेड लागलं होतं म्हणे त्यांना!
--
मिलिंद
तो सारखं 'कबड्डी कबड्डी' म्हणायचा !
अजून एक वेडा त्याचं वेड असं की,
तो सारखं स्वत:शीच बोलायचा !
तसेच होते दोन वेडे,
एक तो नि एक ती,
त्यांचं वेड असं की,
सारखे एकमेकांशी बोलायचे!
आणि गम्मत म्हणजे,
एकाच वेळी वेड लागलं होतं म्हणे त्यांना!
--
मिलिंद
Friday, January 22, 2010
ओवी ला त्रास
कुणीसं म्हटलंय (मीच म्हटलंय),
'भावनांच्या सूक्ष्म छिद्रातून' शब्द ओवले की ओवी तयार होते!
दुष्काळात गोवल्या गेलेल्या काही ओव्या अश्या :
-
कड्यावर कोणी
किडे करू जात
कड्या कपारीत
कोसळला.
--
खरी खरी खीर
खोटी खसखस
खाई दोन्ही घास
खारुताई.
---
गगन गंभीर
गर्जत गाजत
गारांना गाडत
नव्या गारा.
----
घोरत्या घशात
घुसले घुबड
घुबडही गोड
घोरु लागे.
-----
चिमणा चिमणी
निघाले चराया
छोट्या चिऊला या
भीती वाटे.
------
छे !
:मिलिंद
♫

Monday, January 18, 2010
Saturday, January 16, 2010
माझे नावडते शिक्षक
न आवडणाऱ्या शिक्षकांसाठी खास.. (कवी अनिलांची क्षमा मागून),
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या शिक्षकां
काहीतरी सांगू नको,
भरवू नको नुसता फळा!
तव शास्त्र-बाता झेलुनी
आधीच पोरे गांजली
बघ अंत खडुचा पाहता
तज्जन्म झिजुनी संपला..
अमुचा हि त्रास न वेगळा ..
खडुशी जमे समवेदना
म्हणुनी च का रे सांगना
म्हणती 'खडूस' मुले तुला?
फुलती वनी झेंडू फुले
बाकांवारी तितुक्या 'फुल्या'
रचितो अता नामावली
'कुसहस्रनाम' जपायला !
--
मिलिंद
कुणी जाल का सांगाल का
सुचवाल का त्या शिक्षकां
काहीतरी सांगू नको,
भरवू नको नुसता फळा!
तव शास्त्र-बाता झेलुनी
आधीच पोरे गांजली
बघ अंत खडुचा पाहता
तज्जन्म झिजुनी संपला..
अमुचा हि त्रास न वेगळा ..
खडुशी जमे समवेदना
म्हणुनी च का रे सांगना
म्हणती 'खडूस' मुले तुला?
फुलती वनी झेंडू फुले
बाकांवारी तितुक्या 'फुल्या'
रचितो अता नामावली
'कुसहस्रनाम' जपायला !
--
मिलिंद
Subscribe to:
Posts (Atom)