Monday, April 26, 2010

लपाछपी - काही "पराग -विचार"

'लपाछपी' हा महान खेळ आहे असं नेहमी वाटतं मला.. असा खेळ तर 'शोधूनही सापडणार नाही!'
खंत मात्र एक , लपाछपी मध्ये 'लपा' आणि 'छपी' दोन्ही लपण्याचेच शब्द आहेत! सगळेच लपून कसं चालेल? म्हणून 'hide and seek' जास्त सूचक नाव वाटतं. मराठीत 'शोधा म्हणजे सापडेल' सारखं काहीतरी चाललं असतं..

इंद्राला ताक मिळत नाही म्हणतात, मी तर म्हणतो त्याला लपाछपी ची ही मजा नाही मिळणार .. शेवटी 'सगळं काही सापडलेल्या' देवागणांना कसलं आलंय लपाछपीतलं thrill ( = 'बुंगाट मजा' किंवा 'एकशेवीस च्या स्पीड ने मजा') ??

एखाद्या येणाऱ्या घटनेचं anticipation (पूर्वानुभूती?) आणि त्यातली गम्मत लपाछपी मध्ये लपली आहे. मग पुढे लपलेला प्रत्येक क्षण जर आपण असाच, अगदी एक-एक शोधत 'लपाछपी' सारखा खेळलो, तर मग रोज काय मजाच मजा!

--मिलिंद

("पराग विचार" = random thoughts - by शशांकशंकया)

4 comments:

  1. सहीच!
    विचारांत विचार - पराग विचार! =))

    ReplyDelete
  2. 'लपाछपी' हा महान खेळ आहे असं नेहमी वाटतं मला.. असा खेळ तर 'शोधूनही सापडणार नाही!'
    जबरी टाकलायस!

    आणि हो, शेवटच्या परिच्छेदाशी जॅकदादा केरुआक सुद्धा सहमत आहेत:
    ... when all the golden land's ahead of you and all kinds of unforeseen events wait lurking to surprise you and make you glad you're alive to see?
    [On the road - Jack Kerouac]

    दे टाळी!

    ReplyDelete
  3. छानच! मला तर लपलेल्यांच्या पाठीवर धबकन्‌ पोकळपंजा मारून ’छप्प’ आवाज करतात म्हणून ’लपाछप्पी’ म्हणतात असं वाटायचं लहानपणी. :)

    ReplyDelete
  4. धन्यवाद लोकहो!!
    @ शंक्या : वा वा .. 'जैकदादा केरुआक' वाचायला हवे ..
    @ गायत्री: हो.. 'धप्पा' असतो तशी 'छप्पी' शक्य आहे!
    पण का कुणास ठाऊक 'छप्पी' अगदीच पेशवेकालीन धप्पा वाटतो..!!

    ReplyDelete