Thursday, February 11, 2010

सारीपाट

मी आहे बावन्न पत्त्यांमधला एक !
रोज-रोज, तेच ते लोक मला,
त्याच त्या एक्कावन्न पत्त्यांबरोबर पिसतात,
अन तोच एक डाव मांडून बसतात,
तरी त्यांना मजा येतेसं दिसतं !

आता मी आहे एक बशी !
रोज रोज माझ्यातून, तेच दोघं
तोच तो दुधाचा चहा पितात एकत्र..
कधी कधी मला एकमेकांवर फेकूनही मारतात !
त्यांच्या ह्या खेळात त्यांना मजा येत असेल का?

--
मिलिंद

3 comments:

  1. ऎला, असल्या तिरक्या गोष्टी सुचण्यासाठी काही व्यायाम बियाम असतील तर सांगून ठेव बाबा!

    ReplyDelete