Monday, April 26, 2010

लपाछपी - काही "पराग -विचार"

'लपाछपी' हा महान खेळ आहे असं नेहमी वाटतं मला.. असा खेळ तर 'शोधूनही सापडणार नाही!'
खंत मात्र एक , लपाछपी मध्ये 'लपा' आणि 'छपी' दोन्ही लपण्याचेच शब्द आहेत! सगळेच लपून कसं चालेल? म्हणून 'hide and seek' जास्त सूचक नाव वाटतं. मराठीत 'शोधा म्हणजे सापडेल' सारखं काहीतरी चाललं असतं..

इंद्राला ताक मिळत नाही म्हणतात, मी तर म्हणतो त्याला लपाछपी ची ही मजा नाही मिळणार .. शेवटी 'सगळं काही सापडलेल्या' देवागणांना कसलं आलंय लपाछपीतलं thrill ( = 'बुंगाट मजा' किंवा 'एकशेवीस च्या स्पीड ने मजा') ??

एखाद्या येणाऱ्या घटनेचं anticipation (पूर्वानुभूती?) आणि त्यातली गम्मत लपाछपी मध्ये लपली आहे. मग पुढे लपलेला प्रत्येक क्षण जर आपण असाच, अगदी एक-एक शोधत 'लपाछपी' सारखा खेळलो, तर मग रोज काय मजाच मजा!

--मिलिंद

("पराग विचार" = random thoughts - by शशांकशंकया)